राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला गंगापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Foto
दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओमुक्त आयुष्य नेहमी...

गंगापूर, (प्रतिनिधी): शहरात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उपजिल्हा रुग्णालयसह शहरातील १६ लसीकरण केंद्रावर उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात आले.

आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर पालकांनी आपल्या लहान बालकांना आणून पोलिओ डोस दिला. बालकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी आणि पोलिओसारख्या गंभीर आजाराचे निर्मूलन करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळी अतुल प्रकाश रासकर, सदस्य रुग्ण कल्याण समिती, उपजिल्हा रुग्णालय गंगापूर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, पोलिओमुक्त भारत हे आपले सामूहिक ध्येय आहे. आपल्या घरातील प्रत्येक ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओचे दोन थेंब मिळणे आवश्यक आहे. 

पालकांनी कोणताही गैरसमज न ठेवता आपल्या बालकांना लसीकरण करून घ्यावे. आजचा लहानसा प्रयत्न आपल्या मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठे योगदान ठरेल. ते पुढे म्हणाले की, आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने होणे गरजेचे आहे. प्रशासन, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि नागरिक यांच्या सहकार्यानेच ही मोहीम यशस्वी होते.

या मोहिमेत उपजिल्हा रुग्णालय येथे डॉ हर्षल धाबे, डॉ ज्ञानेश्वर चव्हाण,, जे डी कुलकर्णी, रुकसाना शेख, बी बी वाघ, उषा तपसे,, बेबी शेख, नीलम गायकवाड, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व संबंधित कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.